Koregaon Bhima (Photo Credits-Twitter)

Elgar Parishad Event: कोरेगाव भीमा (Koregaon-Bhima) येथील शौर्यदिन येत्या 1 जानेवारीला साजरा केला जातो. याच पार्श्वभुमीवर एल्गार परिषदेने कार्यक्रमासाठी 31 डिसेंबर रोजी परवानगी मागितली होती. परंतु पुणे पोलिसांनी या एल्गार परिषदेला परवानगी नाकारली आहे. काही कार्यकर्त्यांनी एल्गार परिषदेसाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता. पण काही कार्यकर्त्यांनी घरुनच या कार्यक्रमात सहभागी होण्याचे ठरवले होते.(Koregaon Bhima Shaurya Din 2020: कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सूचना जाहीर, 'या' नियमांचे पालन करावे लागणार)

भीमा कोरेगाव विजयस्तंभाला येण्यापूर्वी ज्यांच्याकडे पास असणार त्यांनाच तेथे येण्याची परवानगी दिली जाणार आहे. तर सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचसोबत परिसरात कोणतेही बुक स्टॉल किंवा फलक लावण्यावर ही निर्बंध असणार आहेत.(Bhima Koregaon case: भीमा कोरेगाव प्रकरणी आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हन्या बाबू, सागर गोरखे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल)

Tweet:

दरम्यान, विजयस्तंभाच्या संदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांची विविध संघटनांसोबत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता भिख्खू संघाच्या उपस्थितीत धम्म वंदना केली जाणार आहे. तसेच 1 जानेवारी 2021 रोजील धम्मदेसना बुद्ध वंदना, मान्यवरांकडून वियस्तंभाला अभिनवाद केले जाणार आहे. हा एकूणच कार्यक्रम दुपारी 12 वाजेपर्यंत होणार आहे.

तर पुण्यापासून साधारण 40 किलोमीटर दूर असलेल्या कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 या दिवशी दलित समूहाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. याला काही संघटनांचा विरोध होता. दरम्यान, तत्पूर्वी पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा संबंध सुद्धा या घटनेशी लावला जात आहे. उडालेल्या दंगलीत अनेक लोक जखमी झाले होते.