Koregaon Bhima | (Picture courtesy: Wikipedia)

आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde), गौतम नवलखा (Gautam Navlakha), हन्या बाबू ( Hany Babu) , सागर गोरखे ( Sagar Gorkhe), रमेश गायचोर (Ramesh Gaichor), ज्योती जगताप (Jyoti Jagtap), स्टेन स्वामी (Stan Swamy) आणि मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) यांच्यासह 8 जणांविरुद्ध राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने भीमा कोरेगाव (Bhima Koregaon Case) प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने आज (10 ऑक्टोबर) सकाळीच 83 वर्षीय स्टेन स्वामी यांना झारखंड येथून अटक केली आहे. त्यानंतर दाखल आरोपपत्रात स्टेन स्वामी यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयए कडून सुरु आहे.

पुण्यापासून साधारण 40 किलोमीटर दूर असलेल्या कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 या दिवशी दलित समूहाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. याला काही संघटनांचा विरोध होता. दरम्यान, तत्पूर्वी पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा संंबंधही या घटनेशी लावला जात आहे. उडालेल्या दंगलीत अनेक लोक जखमी झाले होते.

दरम्यन, भीमा कोरेगाव प्रकरणात आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हन्या बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.