प्रतिकात्मक फोटो (Phoro Credits-Twitter)

पुण्यात (Pune) वाढत्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तत्पूर्वी नागरिकांनी खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी केल्याचे समोर आले. खरेदी करण्यावेळी नागरिकांकडून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा सुद्धा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. ऐवढेच नाही तर लॉकडाऊनच्या संधीचा फायदा घेत विक्रेत्यांनी प्रवाशांची लूटले आहे. रविवारपासून पोलिसांकडून लॉकडाऊन लागू होणार असल्याने रस्ते बंद आणि बॅरिगेटर्स लावण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी बाजारपेठांमध्ये गर्दी केली.(पुणे, पिंपरी-चिंचवड येथे आजपासून कडक लॉकडाऊन, 'या' नियमांचे पालन होत आहे की नाही यावर प्रशासनाची असेल करडी नजर)

पुण्यात लॉकडाऊन पूर्वी नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी झाली खरी. पण विक्रेत्यांनी वस्तूंच्या किंमती वाढवून त्याची विक्री नागरिकांनी केली. दुकानांबाहेर नागरिकांच्या लांबलचक रांगा असल्याचे दिसून आले. तर लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल अशी अपेक्षा करण्यात येत होती. परंतु नागरिकांनी सर्वच नियम धाब्यावर ठेवल्याने आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील टाळेबंदीला राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साखुंळे यांनी म्हटले आहे.(Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतील कोरोना बाधितांची एकूण संख्या किती? जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स)

दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून ते 23 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यातील कोरोना संदर्भात रविवारी आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात आणखी 1088 रुग्णांची भर पडली असून 39 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे पुण्यात एकूण बळींचा आकडा 1075 वर पोहचला असून रुग्णांचा आकडा 38,502 वर गेला आहे. पुण्यात 12,890 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हा परिषद विभागाकडून देण्यात आली आहे.