पुणे, पिंपरी-चिंचवड येथे आजपासून कडक लॉकडाऊन, 'या' नियमांचे पालन होत आहे की नाही यावर प्रशासनाची असेल करडी नजर
Coronavirus Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात सर्वात प्रथम पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घालण्यास सुरुवात केल्याने अनेक जिल्हे त्याच्या विळख्यात अडकले गेले आहेत. तर पुणे हा कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट ठरला असून येथे वेगाने रुग्णांसह बळींच्या आकड्यात भर पडत आहे. त्याचसोबत नागरिकांकडून सुद्धा कोविड संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. याच कारणास्तव आता पुणे(Pune), पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे आजपासून ते 23 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.(Lockdown In Pune: पुण्यात येत्या 13-23 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर, पहिल्या टप्प्यात 'या' गोष्टी सुरु राहणार)

लॉकडाऊन आजपासून ते 18 जुलै पर्यंत दरम्यानफक्त मेडिकल शॉप, डेअरी, हॉस्पिटल सुरु राहणार आहेत. तसेच वृत्तपत्रसाठी सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर 19 जुलै ते 23 जुलै वेळी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या शहरी भागसाठी फक्त हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु ग्रामीण भागात लॉकडाऊन नसणार आहे. मात्र लॉकडाऊन संदर्भात काही नियम सुद्धा लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार नागरिकांनी मास्क घालण्यासह सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अत्यावशक असणार आहे.त्यामुळे या नियमांचे पालन होत आहे की नाही यावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. त्याचसोबत विनाकारण नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नसणार आहे.(Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतील कोरोना बाधितांची एकूण संख्या किती? जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स)

दरम्यान, पुण्यातील कोरोना संदर्भात रविवारी आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात आणखी 1088 रुग्णांची भर पडली असून 39 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे पुण्यात एकूण बळींचा आकडा 1075 वर पोहचला असून रुग्णांचा आकडा 38,502 वर गेला आहे. पुण्यात 12,890 कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हा परिषद विभागाकडून देण्यात आली आहे.