Arrested

Pune: पुणे येथील पोलिसांकडून एका तरुणीसह तिघांवर अश्लील शब्दांचा सोशल मीडियात वापर केल्याप्रकरणी अटक केली आहे. तर थेरगाव क्विन (Theregaon Queen) ही सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर अश्लील भाषा वापरुन व्हिडिओ तयार करत ते पोस्ट करायची. या प्रकरणी तिला आणि अन्य एकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. साक्षी श्रीमाळ आणि साक्षी कश्यप अशी आरोपींची नावे आहेत. तर कुणाल कांबळे याच्यावर पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.(Murder: पुण्यामध्ये घरगुती वादातून सासूची हत्या, आरोपीला बेड्या)

Theregaon Queen नावाचे इंस्टाग्रामवर अकाउंट असून त्याला हजारोंच्या संख्येने लोक फॉलो करतात. या मुलीच्या प्रत्येक व्हिडिओत अश्लील शब्दांचा वापर करण्यात आला आहे. हे व्हिडिओ आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी शूट करुन ते  इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तसेच पोस्टच्या खाली कॅप्शन सुद्धा अश्लील पद्धतीचे दिले गेले आहे. (Mumbai: रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे दिल्लीतून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीची तिच्या कुटूंबियासोबत भेट घडली)

दरम्यान, अशा व्हिडिओंमुळे तरुणांची नितीभ्रष्ट होण्यास मानसिक स्थिती बिघडण्याचा प्रकार प्रतित होतो. फिर्यादीने केलेल्या तक्रारीनुसार तिला ताब्यात घेण्यात आले. तर थेरेगाव क्विनसह साक्षी श्रीमाळ यांनी या प्रकरणी पश्चाताप होत असल्याचे म्हणत गुन्ह्याचे गांभीर्य माहिती नसल्याचे म्हटले आहे.