पुणे: कोथरूड येथे बांधकामाचा पाळणा तुटल्याने 2 कामगारांचा मृत्यू
Representational Image | (Photo Credits: ANI)

पुणे (Pune) शहरातील कोथरुड (Kothrud) परिसरात नवीन उभारण्यात आलेल्या 20 मजली इमारतीला रंगकाम सुरु असताना बांधकामाचा पाळणा तुटून 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.  शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच हवेत तरंगत असलेला बांधकामाच्या पाळणा काढून त्यापासून होणारी आणखी एक दुर्घटना थांबवली आहे. अद्याप या मृत कामगारांची कोणतीही माहिती मिळाली नसून त्यांना शवविच्छेदनासाठी जवळील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे सध्या कामवर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोथरुड परिसरातील महात्मा सोसायटी शेवटच्या टोकाला डोंगराजवळ नवीन उभारण्यात आलेल्या इमारतीला रंग देण्याचे काम सुरु होते. यामुळे 2 कामगार बांधकामचा पाळण्याच्या सहाय्याने इमारतील रंग मारत होते. दरम्यान, बांधकाम पाळणा तुटून खाली कोसळला. यामुळे दोन्ही कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती होताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मृतांचे शरीर शवविच्छेदनासाठी जवळील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हे देखील वाचा- कानपूर येथे पूर्वा एक्स्प्रेसला भीषण अपघात; 12 डबे रुळावरून घसरले, अनेकजण जखमी

इमारतील बांधलेला पाळणा हा मध्येच अडकला होता. तो खाली कोसळून आणखी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. यामुळे कामगारांच्या मदतीने अग्निशामन दलाने तो खाली घेतला आहे. स्थानिक पोलिस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे.