Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) शेकडो संपकरी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर निदर्शने (Protest) करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी दगडफेकही केल्याचा दावा केला जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे चपलाही फेकल्या. या घटनेमागे कोण आहे याचा शोध पोलिसांनकडून शोध चालु आहे. तसेच या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून आज राज्यभर आंदोलन केलं जात आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. माझी हत्या होऊ शकते, त्यासाठी वळसे पाटील जबाबदार असतील, असं वक्तव्य काल सदावर्तेंनी केलं होतं. कोणतीही नोटीस न देता घरातून नेलं असा त्यांचा आरोप आहे.

आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी काढले बाहेर 

दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज करून बाहेर काढले. आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाहीत आणि रेल्वे स्थानकातून ही पोलीस जा सांगत आहेत. यामुळे आता आम्ही काय करणार आम्ही इथेच बसून राहू असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. (हे देखील वाचा: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारणा करत सुरक्षेत त्रुटी असल्याचा मुद्दा केला उपस्थित)

मुख्यंत्र्यांनी केली विचारपूस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांना फोन करून त्यांची प्रकृती जाणून घेतली. त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याशीही चर्चा केली. पवारांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित केला.