अॅड. प्रकाश आंबेडकर (File Photo )

या देशातील कायदा कोणासही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही. असे असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे एके ४७ रायफल आलीच कशी? असा सवाल भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला विचारत आहे. तसेच, या प्रकरणी आंबेडकर यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मोक्का कायद्याखाली चौकशी व्हावी, अशी मागणीही केली आहे. कोणाकडे शस्त्र सापडे की, त्याच्यावर अतिरेकी कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन चौकशी केली जाते. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करत भागवत यांच्यावरही मोक्का अंतर्गत करावाई करा, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरएसएसने जमा केलेला शस्त्रसाठा जर जप्त केला नाही तर, आपण नायायालयात जाऊ तसेच, रस्त्यावर उतरुन मोर्चा काढू असा इशाराही प्राकाश आंबेडकर यांनी दिला आहे. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी भूदल, नौदल आणि वायूदल अशी व्यवस्था आहे. तसेच, राज्यातील कायदा व सुव्यवस्था रखण्यासाठीही पोलीस यंत्रणा आहे. मग, आरएसएस प्रतिसनैन्य कशासाठी उभारत आहे? असा सवाल आंबेडकर यांनी विचारला आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनससमोरील अमरज्येत या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाने शांतता आंदोलन केले. या वेळी उपस्थितांना संबोधीत करताना आंबेडकर बोलत होते.