पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) सावध भूमिका घेत असतान शिवसेना (Shiv Sena) वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) हेसुद्धा अडचणीत येणार नाही याची दक्षता घेत आहे. आता तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट संजय राठोड यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे. संजय राठोड प्रसारमाध्यमांशी बोलत नाहीत ते योग्यच आहे. नाहीतर पुन्हा तुम्हीच म्हणाला असता तपास यंत्रणांवर दबाव टाकला जातो आहे. दरम्यान, संजय राठोड अद्यापही नॉट रिचेबल आहेत. ते कोठे आहेत कोणालाच माहिती नाही. दरम्यान, येत्या गुरुवारी ते सेवालाल महाराजांसमोर नतमस्त होतील. त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू मांडतील, असे समजते.
संजय राठोड प्रकरणात बोलताना संजय राऊत म्हणाले, विरोधकांनी आपल्याकडे विरोधाचे अस्त्र आहे म्हणून कोठूनही हवेत गोळ्या मारु नये. प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपास होऊ द्यावा. त्यानंतरच सत्य बाहेर येईल त्यावर बोलावे. या प्रकरणात राठोड काहीच बोलत नाहीत. धनंजय मुंडे यांच्याबद्दलही असे काही प्रकरण घडले तेव्हा त्यांनी स्वत: या घटनेची माहिती दिली होती, असे विचारले असता. दोन्ही प्रकरणं वेगवेगळी आहेत. तुम्ही उगाच याचं तंगड त्याच्यात घालू नका. शिवाय, या प्रकरणात राठोड यांनी का बोलावं? असा प्रतिसवाल राऊत यांनी केला. (हेही वाचा, Pooja Chavan Suicide Case: वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे प्रसारमाध्यमांतून वृत्त, शिवसेना खासदार राऊत म्हणाले 'मला कल्पना नाही')
पुढे बोलताना राऊत यांनी म्हटले की, संजय राठोड या प्रकरणात बोलत नाहीत तर तुम्ही विचारता का बोलत नाहीत. जर बोलले असते तर तुम्हीच म्हटला असता तपास यंत्रणांवर दबाव टाकला जातो आहे.
दरम्यान, संजय राठोड हे येत्या गुरुवारी संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचे वृत्त आहे. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यापासून संजय राठोड हे जोरदार चर्चेत आहेत. राठोड हे सध्या नॉट रिचेबल आहेत. ते कोठे आहेत हे जाहीरपणे कोणालाच माहिती नाही.