Ulhasnagar: मुथुट फायनान्स ऑफिसमधील चोरीचा डाव पोलिसांनी उधळला; 7 जणांना अटक
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

उल्हासनगर (Ulhasnagar) मधील मुथुट फायनान्स (Muthoot finance) ऑफिसमधील चोरी डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी (Vithalwadi Police) 7 जणांना अटक केलं आहे. गुप्त भुयारी मार्गाने बँक लुटण्याचा यांचा प्लॅन होता. त्यासाठी ते ड्रिल मशीनने भुयार तयार करत होते. पोलिसांनी या 7 जणांनी रंगेहात पकडले आहे.  (Mumbai: पार्सल देण्याच्या बहाण्याने डॉक्टरांच्या घरात घुसून चोरीचा प्रयत्न; मेडिकल मालकासह 2 साथीदारांना अवघ्या काही तासांत अटक)

जहीर अहमद (30), इम्मामुद्दीन कासिम खान (57), रिजाउल शेख (Singh 35), राम सिंग (32), काळू शेख (55), तपन मंडल (48) आणि अजिम शेख (28) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण सध्या उल्हासनगरमध्ये राहत होते. त्यापैकी जहीर आणि इम्मामुद्दीन हे उत्तर प्रदेश मधील असून राम सिंह नेपाळचा आहे. इतर चौघेजण झारखंड मधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शनिवारी सकाळी हे सर्व आरोपी कॅम्प नंबर 4 मध्ये पाण्याच्या टाकीजवळ खड्डा खणत असताना त्यांना पोलिसांनी अटक केली. यांनी यापूर्वी देखील अशा प्रकारचा गुन्हा केला असून आता त्याची पुर्नरावृत्ती करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठे नुकसान टळले.

काही दिवसांपूर्वीच चेन्नईमधील एसबीआयच्या एटीएम मधून तब्बल 48 लाखांची चोरी करण्यात आली होती. दरम्यान, कोविड-19 लॉकडाऊन काळात चोरीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, कोरोना संकटाने अनेकांचे आर्थिक नुकसान केले. रोजगार हिरावले. त्यामुळे पुन्हा एकदा चोरीच्या घटना काळावर पडू लागल्या आहेत. तसंच लॉकडाऊन काळात ऑनलाईन व्यवहार वाढल्याने ऑनलाईन फ्रॉर्डमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.