Arrest | Representational Image | (Photo Credit: ANI)

मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी (Jogeshwari) मधील एका डॉक्टरांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मेडिकल दुकानाच्या मालकाला सह दोघांना अटक केली आहे. गुरुवारी (15 एप्रिल) पार्सल डिलिव्हरी करण्याच्या बहाण्याने मेडिकल मालकाच्या दोन साथीदारांनी वेशांतर करुन डॉक्टरांच्या इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर घरात घुसून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या या टोळीला पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केले. (Mira Road: शस्रांचा धाक दाखवत चार चोरट्यांकडून ज्वेलरीच्या दुकानातून 2 कोटी सोन्यासह डायमंडची चोरी)

या चोरीचा संपूर्ण कट मेडिकलचे मालक विक्रम यादव याने रचला होता. यात यादव यांना 32 वर्षीय अजय यादव आणि 18 वर्षीय राजेश यादव यांनी साथ दिली. जोगेश्वरी सॅटलाईट पार्क बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर डॉक्टरांची पत्नी सुशीला यादव या घरी एकट्या असताना दुपारी 1.45 वाजता घडली. पार्सल घेण्यासाठी सुशीला यांनी दरवाजा उघडला असता दोघांनी घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी आरडा ओरडा करणाऱ्या डॉक्टरांच्या बायकोच्या मदतीला शेजारचा नागेश बुर्ला नामक तरुण धावून आला. त्याने चोरांच्या हातून चाकू हिसकावून घेताच चोरांनी तेथून पळ काढला. त्यानंतर मेडिकल दुकानदार इमारतीच्या आवारात संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसून आले. नागेश बुर्ला आणि इतर रहिवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, चोरट्यांसोबत झालेल्या झटापटीत डॉक्टरांच्या पत्नीच्या हाताला छोटीशी इजा झाली आहे.

लॉकडाऊनमुळे विक्रमवर 20 लाखांचे कर्ज झाले होते. यासोबतच शाळेची फी न भरल्यामुळे त्याच्या मुलाला शाळेतून काढून टाकण्यात आले होते. या आर्थिक संकटातून मार्ग काढण्याच्या उद्देशाने त्याने हा चोरीचा कट रचला असल्याची कबुली दिली. तसंच यापूर्वी डॉक्टर पेन्शटला औषध खरेदीसाठी त्याच्या मेडिकलमध्ये पाठवत असतं. मात्र डॉक्टरांच्या मित्राने त्याच परिसरात मेडिकल दुकान सुरु केल्यानंतर पेन्शट औषध खरेदीसाठी तेथे जावू लागले. याचा रागही त्याच्या मनांत होता, असेही त्याने चौकशी दरम्यान सांगितले. दरम्यान, जोगेश्वरी पोलिस स्टेशनचे सिनियर इंस्पेक्टर महेंद्र नेरलेकर यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.