Mira Road Robbery (Photo Credits-ANI)

Mira Road: मिरा रोड येथे गुरुवारी चार चोरट्यांनी शस्राचा धाक दाखवत एका ज्वेलरीच्या शो रुम मधून 2 कोटी रुपयांचे सोने आणि डायमंडची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी ही चोरी अवघ्या 15 मिनिटांत केली असून घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. तर सीसीटीव्हीच्या व्हिडिओ असे दिसून आले आहे की, एक 30 वर्षीय व्यक्तीने कोरोनामुळे मास्क घातला असून 8 वर्ष जुन्या अशा एस कुमार गोल्ड अॅन्ड डायमंड शो रुमध्ये प्रवेश करतो. ही घटना दुपारी 2 वाजताची असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुकानात प्रवेश केल्यानंतर आरोपींपैकी एकजण काउंटवर असलेल्या व्यक्तीशी दागिन्यांबद्दल बोलते, तर दुसरा आपल्याकडील बंदुकीचा धाक दाखवतो आणि त्यांचा साथीदार हा दुकानातील दागिने आपल्याकडे असलेल्या बॅगेत भरत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले आहे. कानातले आणि हातात घालण्यामधील काही दागिने त्यांनी घातलेल्या पॅन्टमध्ये ठेवले. तसेच दुकानातील सिक्युरिटी गार्ड खुर्चीवर बसून त्यांना विनंती करत असल्याचे ही दिसले आहे. या सर्व प्रकारात 15 मिनिटांनंतर त्यांनी आपण सर्व दागिने घेतल्याची खात्री करत निघून गेले.(Maharashtra Gram Panchayat Election 2021: अपहरण करुन 75 वर्षांचा उमेदवार पळवला, आरोपींना अटक; पेठ ग्रामपंचायत निवडणुकीतील घटना)

Tweet:

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे मोटरसायकलवरुन आले होते. त्यापैकी दोन जणांनी मोटरबाईकवरुन बॅग आपल्यासोबत ठेवत पळ काढला. तर अन्य दोन जणांनी त्यांच्या टू व्हिलर तेथेच टाकत पायी पळत गेले. गाड्या चोरीच्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर दुकानातील कर्मचाऱ्याने असे म्हटले की, मास्क घालून आलेल्या आरोपीने स्वत:ला ग्राहक असल्याचे भासवून दिले. यापूर्वी 30 डिसेंबरला भोईसर मधील शोरुम मधून 8 कोटी रुपयांचे दागिने चोरी केल्याची घटना समोर आली होती.