पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (PMC) मुख्य आरोपीला देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात रक्सौल सीमेवर अटक करण्यात आली आहे. 2019 मध्ये पीएमसी बँकेत 4 हजार 355 कोटींचा (PMC Bank Scam) घोटाळा झाला होता. या घोटाळ्यात बँकेचे संचालक दलजीत सिंग बल हे मुख्य आरोपी म्हणून नावाजले होते. महाराष्ट्रतील EOW या बँक घोटाळ्याची चौकशी करत होते आणि दलजित सिंग याचा शोध घेत होते. मात्र दलजितसिंग बल तपास यंत्रणेला चकमा देऊन फरार होता. नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्याप्रमाणे दलजीत सिंग बलही नेपाळमार्गे कॅनडाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. दलजीत महाराष्ट्रातून रक्सौल सीमेवर अगदी सहज पोहोचला, मात्र नेपाळमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 200 मीटर अंतरावरच इमिग्रेशन विभागाने पीएमसी बँकेचे संचालक दलजीत सिंग बल याला अटक केली आहे.
इमिग्रेशन विभागाने मुंबई EOW या विभागाला कळवले आहे. मुख्य आरोपी दलजीत सिंग बल याला आता रक्सौल पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, EOW टीम पटणा मध्ये पोहोचली आहे आणि लवकरच रक्सौलला पोहोचेल आणि मुंबईला घेऊन जाईल. त्याचबरोबर या प्रकरणी कोणताही अधिकारी काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहे.
Tweet
One of the prime accused of PMC Bank Scam matter, Daljit Singh Bal - a part of the Board of Directors - arrested by the Immigration Team from Bihar-Nepal border last evening. Economic Offences Wing(EOW), Mumbai team has left for Bihar to take him into their custody: Mumbai Police
— ANI (@ANI) February 3, 2022
महाराष्ट्रात कधी झाला घोटाळा ?
2019 मध्ये महाराष्ट्रात कर्ज फसवणूक आणि घोटाळा उघडकीस आल्यानंतर आरबीआयने पीएमसी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. याशिवाय आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यासही बंदी घातली होती. या फसवणूक आणि घोटाळ्यात बँकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी सामील असल्याचे आढळून आले. रिअल इस्टेट कंपनी एचडीआयएलला दिलेल्या कर्जाबाबत बँकेने आरबीआयला योग्य माहिती दिली नाही. (हे ही वाचा Antilia Bomb Scare Case: परमबीर सिंह हेच अँटिलीया प्रकरणाचे मास्टरमाईंड; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जबाब)
काय आहे पीएमसी बँक घोटाळा?
24 सप्टेंबर 2019 रोजी, पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (PMCB) लाखो ग्राहकांना माहिती मिळाली की रिझर्व्ह बँकेने PMCB चे नियंत्रण सहा महिन्यांसाठी घेतले आहे. याचा सरळ अर्थ असा की बँकेचे व्यवस्थापन आणि कामकाज सहा महिन्यांसाठी रिझर्व्ह बँकेच्या हातात असेल. या नियंत्रणाचा अर्थ असा होता की बँकेतून ठेवी, कर्जे इत्यादी काढणे मध्यवर्ती बँक ठरवेल. याची माहिती मिळताच खातेदारांनी जवळच्या शाखा गाठण्यास सुरुवात केली. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने बँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा एक हजार रुपयांपर्यंत मर्यादित केली होती. घाबरलेल्या खातेदारांच्या सोयीसाठी, रिझर्व्ह बँकेने लवकरच पैसे काढण्याची मर्यादा 10,000 रुपये आणि नंतर 25,000 रुपये केली आहे.