धुळे: शहीद जवान कुटुंबीयांच्या आश्रूंचा बदाल घेतल्याशिवाय राहणार नाही: नरेंद्र मोदी
PM Narendra Modi in Maharashtra | (Photo Credits: ANI)

After Pulwama Terror Attack PM Narendra Modi in Maharashtra: शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी स्वत:ला एकटं समजू नये. या कुटुंबीयांचं दुख: मोठं आहे. देशातील सव्वाशे कोटी जनता या कुटुंबांसोबत आहे. ज्या आईंनी भारतमासेसाठी शहीद होणाऱ्या वीर जवानांना जन्म दिला त्यांना मी नमन करतो. असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुलवामा (Pulwama Terror Attack) येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे सात्वन करीत धीर दिला. तसेच, शहीद जवान कुटुंबीयांच्या आश्रूंचा बदाल घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा कठोर शब्दांमध्ये हल्याचा सूत्रधार असलेल्या पाकिस्तानला इशाराही दिला. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. ही लाट काम असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (16 फेब्रुवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी धुळे येथील सभेत बोलत होते.

या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा भारत हा पूर्वीचा भारत राहिला नाही. आजचा भारत हा नव्या रितींचा आणि नीतींचा देश आहे. लवकरच याचा अनुभव जगालाही येईल असा गर्भीत इशारा पंतप्रधान मोदींनी या वेळी दिला. भारत हा कोणाच्या वाट्याला जात नाही. पण, जर कोणी भारताच्या वाट्याला गेला तर त्याला सोडतही नाही, अशी आठवणही पंतप्रधानांनी या वेळी करुन दिली. जवानांवर हल्ला करणारे, बंदुका चालवणाऱ्यांची झोप उडवली जाईल यात मला कोणतीही शंका नसल्याचेही पंतप्रधान या वेळी म्हणाले. (हेही वाचा, पुणे: पाकिस्तानी झेंड्यावर लायटर फ्री; घरात घुसून धडा शिकवा, लोक व्यक्त करतायत संताप)

 

चौदा फेब्रुवारी या दिवशी जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ला केला. CRPF जवानांच्या ताफ्यावर झालेल्या या हल्ल्यात तब्बल 42 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतपाची लाट निर्माण झाली आहे. देशात असे वातावरण असताना विविध विकासकामांचे आयोजन करण्यासाठी पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. महाराष्ट्रातील दोन जवानाही या हल्ल्यात शहीद झाले आहेत. एकूण परिस्थितीवरुन महाराष्ट्रातही संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमिवर आजच्या कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.