Prakash Ambedkar (Photo Credit: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी कोरोना विरुद्ध लढ्यासाठी (Coronavirus Fights)  20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली.“हे पॅकेज भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. हे पॅकेज जीडीपीच्या 10 % असल्याची माहिती मोदींनी दिली होती. या घोषणेला विविध स्तरावरून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. अनेकांनी मोदींचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हणत कौतूक केले आहे तर काहींनी मात्र हे केवळ आश्वासन आहे असे म्हणत ताशेरे ओढले आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सुद्धा टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पॅकेज जाहीर केले पण त्याबाबत सविस्तर माहिती देण्याचे काम अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman)  व अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर सोपवले त्यांना कठोर निर्णय जाहीर करताना कधीच पाहिलेले नाही,  जर त्यांना पूर्ण माहिती द्यायची नसेल तर लाईव्ह येऊन देशाला संभ्रमात का टाकतात?असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. Coronavirus: आत्मनिर्भर भारत हे आपले उद्दीष्ट, जबाबदारी- पंतप्रधान मोदी

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतीही कठोर किंवा वाईट बातमी देशासमोर द्यायची नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी हे सर्व सोडून दिलं आहे. कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा,” “जर पंतप्रधानांना काही ठोस सांगायचंच नसेल तर ते लाईव्ह येऊन गोंधळ निर्माण करतातच का?” असा सवालही त्यांनी केला आहे. अशा आशयाचे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. Lockdown: लॉकडाऊन वाढविण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर ट्विट

मध्यम वर्गाला बळ देताना आणि आर्थिक दुर्बल वर्गाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात सुद्धा दिसून आला. याचीच पुनरावृत्ती चौथ्या टप्प्यात सुद्धा होत आहे. तसेच संघटीत मध्यमवर्गासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पण असंघटीत आणि स्थलांतरीत कामगारांच्या हाती निराशाच आली आहे. अशीही टीका आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर ट्विट

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज संध्याकाळी 4  वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी काल जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेज बाबत सविस्तर माहिती सीतारामन आज स्पष्ट करू शकतात.