Coronavirus: आत्मनिर्भर भारत हे आपले उद्दीष्ट, जबाबदारी- पंतप्रधान मोदी
File image of PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

पंतप्रधन नरेंद्र मोदी देशातील जनतेला संबोधीत करत आहे. या संबोधनात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, आज जग संकटात आहे. तेव्हा आपणास आपला संकल्प अधिक मजबूत करायचा आहे. आमचा संकल्प या संकाटपेक्षाही विराट असेन. आम्ही गेल्या शकतापासून सातत्याने ऐकत आलो आहोत की, 21 शतक हे भारताचे आहे. आम्ही कोरोना संकटाला, जगाला विस्ताराने पाहण्याची संधी मिळाली आहे. जगभरात कोरोनामुळे येणारे बदल आम्ही पाहात आहोत. या सर्व कालखंडाला भारताच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास वाटते की, हे शतक भारताचे आहे. हे केवळ स्वप्न नाही. जबाबदारी आहे. ती पेलण्यासाठी एकमेव मार्ग आहे. तो म्हणजे आत्मनिर्भर भारत.

नियमाचे पालन करुन कोरोनावरुद्ध लढाई- पंतप्रधान मोदी

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात अनेक परिवारांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत. सर्वांच्या प्रति माझी संवेधना. एक व्हायरस. एका व्हायरसने जगाला धक्का दिला आहे. जगभरात कोट्यवधी आयुष्यं संकटाचा सामना करत आहेत. सर्व जग आयुष्य वाचविण्यासाठी एक प्रकारच्या युद्धात अडकली आहे. आम्ही असे संकट कधी पाहिले आहे ना कधी ऐकले आहे. निश्चित रुपाने. मानव जातीसाठी हे सर्व काही अकल्पीत असे आहे. हे संकट अभूतपूर्व आहे. परंतू, थकने, हारने, तूटणे, उदद्धवस्त होणे, मानावाला मंजूर नाही. सतर्क राहून सर्व नियमांचे पालन करुन आम्हाला वाचायचेही आहे आणि पुढेही जायचे आहे, असे मोदी या वेळी म्हणाले.

भारताने संकटाला संधीत परावर्तीत केले- पंतप्रधान मोदी

आज आपण मोठ्या टप्प्यावर आहोत. इतके मोठी परिस्थिती भारतासाठी एक संकेत, एक संधी घेऊन आली आहे. जेव्हा कोरना संकट सुरु झाले तेव्हा. भारतात एकही पीपीई किट बनत नव्हते. एन 19 मास्कचे भारतात केवळ नाममात्र उत्पादन होत होते. पण, आज एकट्या भारतात 2 लाख पीपीई आणि 2 लाख एन 19 मास्क तयार होत आहेत. हे त्यामुळेच घडले कारण आपण संकटाला संधीत परावर्तीत केले. यापूढेही संकटाचा सामना संधीत करण्यात भारताला यश येईल.

जगासमोर भारताचे मुलभूत चिंतन हे आशेचा किरण घेऊन येत आहे. भारताची संकृती, भारताचा विचार ही विश्वाला संदेश देते. ज्याचा विचार आहे वसुधैव कुटुंबकम. भारत जेव्हा आत्मनिर्भरतेचा विचार व्यक्त करतो तेव्हा तो केवळ आत्मकेंद्री निर्भर करत नाही. तर, कटुंब, मानवी संकल्पना याची पूर्ततेचा विचार मांडतो, असे मोदी या वेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (12 मे 2020) देशातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील नजतेशी आपण संवाद साधणार आहोत अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विटद्वारे कालच दिली होती. दरम्यान, पहिले दोन लॉकडाऊन वाढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्याची घोषणा केली होती. मात्र, तिसऱ्यांदा जेव्हा लॉकडाऊन कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा त्याची घोषणा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नव्हती. केंद्रीय गृहमंत्रालयाने केवळ एक पत्र काढून या निर्णयाची माहिती दिली होती. त्यामुळे आजच्या भाषणात पंतप्रधान मोदी काय निर्णय जाहीर करतात याबाबत उत्सुकता होती.