PM Kisan Samman Nidhi Yojana 15th Installment: लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरु केली. हा एक कल्याणकारी कार्यक्रम आहे. जो आज भारतभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम वळती करतो. यामध्ये प्रत्येक वर्षी तिन टप्प्यांमध्ये एकूण 6,000 हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना भेटत असते. त्यासाठी चार महिन्यांच्या फरकाने 2000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. दरम्यान, शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत लवकरच 15 वा हफ्ता मिळणार असून त्यांची दिवाळी गोड होणार आहे. आपणही या योजनेचे लाभार्थी असाल तर त्या यादीत तुमचे नाव आहे की नाहे हे आपण तपासू शकता. त्यासाठी पुढील माहिती महत्त्वाची ठरु शकते.
पीएम किसान योजना लाभार्थी निकष आणि पेमेंट मोड:
पीएम किसान योजना प्रामुख्याने 2 हेक्टरपेक्षा कमी लागवडीयोग्य जमीन असलेल्या लहान आणि सीमांत शेतकर्यांना निधी देते. शेतकर्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या शेतीच्या कामांसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होणे हा या आर्थिक सहाय्यापाठिमागचा हेतू आहे. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या निधीसाठीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वळती होते. ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) असेही म्हणतात.
ही योजना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येते. मात्र त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची ओळख पटवणे, लाभार्थी डेटाबेस राखणे आणि निधी हस्तांतरित करणे सुलभ करण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन जबाबदार आहेत.
यादीमध्ये नाव कसे तपासाल?
पीएम किसान योजनेंतर्गत आपणास निधी मिळाला आहे किंवा नाही याच्या माहितीसाठी https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या. इथे तुम्हाला एक भारताचा नकाशा पाहायला मिळेल. जो पेमेंट सक्सेस टॅबच्या खाली खाली असतो. इथे तुम्हाला उजव्या बाजूला एक पिवळ्या रंगाचा टॅब डॅशबोर्ड पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करा. तूमची माहिती त्यावर तुमच्या माहितीचा तपशील भरा तुमचे राज्य, जिल्हा, तालूका आणि पंचायत निवडा. तुम्हाला तुमचे नाव यादीत आहे किंवा नाही याबाबत माहिती मिळेल.
ऑनलाइन नोंदणी: शेतकरी पीएम-किसान योजनेसाठी अधिकृत पीएम-किसान पोर्टल (https://pmkisan.gov.in/) द्वारे नोंदणी करू शकतात. हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणि त्यांच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. पीएम-किसान योजनेसाठी बजेट केंद्र सरकारद्वारे वाटप केले जाते. या योजनेचा उद्देश देशभरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे.