Image For Representation (Photo Credits-Facebook)

देशभरात ऑनलाईन पद्धतीच्या व्यवहारांना चालना मिळण्यासाठी डिजिटल पेमेंट सेवा सरकारकडून सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा झाला असून त्यांचा वेळ वाचत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना पैशांच्या नावाखाली गंडा घालण्याचे प्रकार समोर आले आहे. अशा फसवणूकदरांच्या विरोधात गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. तरीही दिवसेंदिवस नवं नवीन मार्ग शोधून नागरिकांची दिशाभूल करत फसवणूक केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड येथे नागरिकांना ईएमआय स्थगित करण्याच्या नावाखाली फोन करत त्यांच्याकडून ओटीपी मागितला जातो. त्यानंतर भामटे लोक ग्रहकांना लूटत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल पेमेंटसाठी सोशल मीडियात विविध अॅप उपलब्ध आहेत. त्याच्या माध्यमातून नागरिक सध्या व्यवहार करत आहे. पण ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करताना आपल्या बँक खात्यासंदर्भातील कोणतीही माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करु नका अशी सुचना दिली जात आहे. तर पिंपरी-चिंचवड येथे फसवणूक करणारे व्यक्ती ग्राहकांना त्यांचे ईएमआय स्थगित करण्यासाठी ओटीपी सांगण्यासाठी कॉल करत आहेत. एकदा ओटीपी सांगितला की, रक्कम काढली जात आहे. कृपया कोणत्याही व्यक्तींना किंवा दुव्यावर ओटीपी शेअर करू नका. तसेच इतर कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.(नवी मुंबई: अवैधरित्या मद्य विक्री करणा-या संजोग बार च्या मॅनेजर आणि वेटर्संना वाशी पोलिसांनी केली अटक) 

दरम्यान, सध्या कोरोना व्हायरस थैमान घालत असल्याने विविध स्तरातून आर्थिक मदतीसाठी हात पुढे येत आहे. प्रत्येक जण आपल्यापरीने मदत करत आहे. मात्र काही भामटे लोक देशावरील आलेले कोरोनाचे संकट विसरुन जात लोकांना फोन करुन त्यांच्या बँक खात्याची विचारणा करत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी एका मुलाने समोर आणला होता. त्यामुळे तुम्ही बँकेच्या नावाने फोन किंवा मेसेज आल्यास त्याला उत्तर देण्यापूर्वी आधी विचार करा.