नवी मुंबई: अवैधरित्या मद्य विक्री करणा-या संजोग बार च्या मॅनेजर आणि वेटर्संना वाशी पोलिसांनी केली अटक
Alcohol | Representative Image (Photo Credit: Wikimedia Commons)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. अशा स्थितीत बरेचसे हॉटेल्स, रेस्टॉरन्ट बंद ठेवण्यात आले आहेत. तरी सुद्धा नवी मुंबई (Navi Mumbai) अवैधरित्या मद्य विक्री केल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील संजोग बार आणि रेस्टॉरन्टमध्ये (Sanjog Bar & Restaurant) )लॉकडाऊनच्या काळात अवैधरित्या मद्य विक्री केल्या प्रकरणी या हॉटेलच्या मॅनेजरसह वेटर्सला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर या हॉटेलमधून 1.31 लाखांचा मद्यसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. वाशी पोलिसांनी याबाबत खबर लागताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन दोषींना अटक केली.

नवी मुंबईतील संजोग बार आणि रेस्टॉरन्टमध्ये देशभरात पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केले असतानाही तेथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या हॉटेलमध्ये धाड टाकून या हॉटेलच्या मॅनेजरसह वेटर्संना अटक केली आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus: 67 नव्या रुग्णांसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 490; उपचारानंतर 50 जणांना डिस्चार्ज

मुंबई (Mumbai) शहरासह राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांची संख्या आता 490 इतकी झाली आहे. यात मुंबई शहरातील नव्याने नोंद झालेल्या 43 रुग्णांचाही समावेश आहे. नव्या रुग्णांसह एकट्या मुंबई शहरातील रुग्णांची संख्या 278 इतकी झाली आहे. मुंबई शहरासह राज्यातील इतर शहरं आणि काही प्रमाणात ग्रामिण भागातही कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांचा विचार करता ती आकडेवारीही मोठी आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या संख्या 2547 इतकी आहे. त्यापैकी 162 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असल्याने आणि त्यांना सध्या आराम वाटत असल्याने घरी सोडण्यात आले आहे.