Coronavirus: 67 नव्या रुग्णांसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 490; उपचारानंतर 50 जणांना डिस्चार्ज
COVID-19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील (Maharashtr) कोरना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची ताजी आकडेवारी आली आहे. आज महाराष्टात नव्या 67 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या आता 490 इतकी झाली आहे. त्यापैकी 50 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या सुरुवातीला हळूहळू आणि आता वेगाने वाढते आहे. त्यामुळे राज्य सरकारही अधिक सतर्क झाले असून, परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये यासाठी लॉकडाऊन असूनही अधिक प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रासोबतच देशभरातही कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आज दिवसभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2547 वर पोहोचली. देशभरात आतापर्यंत 162 कोरोना व्हायरस बाधितांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 62 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 2322 इतकी आहे. (हेही वाचा, Coronavirus: देशात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 2547; 162 जणांना डिस्चार्ज, 62 जणांचा मृत्यू - केंद्रीय आरोग्य मंत्रालय)

एएनआय ट्विट

दरम्यान, जगभरातही कोरोनाचा विळखा अद्यापही कायम आहे. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमधील वूहान शहर हे कोरोना नियंत्रणात आले आहे. तेथील लॉकडाऊनही हटविण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी जगभरातील स्थिती मात्र अधिकच गंभीर होत चालली आहे. प्रामुख्याने इटली, अमेरिका, फ्रान्स, जर्मऩी आणि जपान या देशांसमोरील आव्हान अधिक वाढले आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक म्हणजे भारत अद्याप तरी कोरोनावर नियंत्रण ठेऊन आहे.