पिंपरी चिंचवड महापालिकेकडून डांगे चौक येथे अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई | (Photo Credit - X/ANI)

पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अतिक्रमण विरोधी पथकाने वाकड, डांगे चौक (Dange Chowk News) आणि दत्त मंदिर परिसरात जोरदार मोहीम (Anti-encroachment Drive) राबवली. या मोहिमेमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या अनेक इमारतींवर हातोडा (Unauthorised Constructions Demolition) चालवत त्या जमीनदोस्त करण्यात आल्या. परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी सदर इमारतींचे अतिक्रमण हटविणे आवश्यक होते. त्यामुळे पालिकेने ही विशेष कामगिरी हाती घेतली. त्यासाठी पालिकेने जेसीबी, बुलडोझर आणि तत्सम यंत्रांचा वापर केला. प्रशासनाकडून राबविण्यात आलेली ही कारवाई म्हणजे शहरव्यवस्थापन, रस्तारुंदीकरण आणि नागरी सुविधांच्या पूर्ततेचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.

अनधिकृत बांधकामांमुळे प्रशासकीय कामात अडथळा

पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीमध्ये पाठिमागील काही वर्षांपासून अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहेत. ज्याचा परिणाम शहरं अवाढव्य आणि कोणत्याही धारबंधांशिवाय वाढू लागली आहेत. परिणामी त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सूत्रबद्धता पाहायला मिळत नाही. इतकेच नव्हे तर नागरिकांना वाटेल तशा अव्यवस्थितपणे वाढणाऱ्या इमारती अनेकदा दाटीवाटी आणि रहदारीस कारण ठरतात. परिणामी कोरोना महामारीसारखी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास परिस्थिती हाताळणे प्रशासनास कठीण होऊन जाते. शिवाय, इमारीती दाटीवाटीने उभ्या असल्याने रस्ते अरुंद होतात. परिणामी काही अप्रिय घटना घडल्यास प्रशासनाला तातडीची मदत उपलब्ध करण्यात मोठा अडथळा निर्माण होतो. (हेही वाचा, PCMC Construction Guidelines: रात्री 10 नंतर बांधकामास परवानगी नाही; ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नियम)

डांगे चौक परिसरात करण्यात आलेली कारवाई (Video)

कुदळवाडी, चिखली, देहू-आळंदी रोडवर अनधिकृत बांधकामांना ऊत

पाठिमागील आठवड्यातच येथील एका भंगारच्या दुकान आणि गोडाऊनला आग लागली होती. त्यानंतर उद्भवणारी संभाव्य परिस्थिती आणि घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पीसीएमसी प्रशासनाने अनधिकृत बांधकामे, गोडाऊन आणि इमारती जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, 18-20 डिसेंबर (2024) दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुदळवाडी, चिखली आणि देहू-आळंदी रस्त्यावरील इतर भागात 2,31,099 चौरस फूट बेकायदा बांधकामे उघडकीस आणली. ज्यामध्ये आरसीसी स्ट्रक्चर, वीट बांधकाम आणि टिन शेडचा समावेश होता. प्रस्तावित डीपी रस्त्यांमधून सर्व बांधकामे मोकळी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा, Under-Construction Building Demolished in Wakad: वाकड मध्ये निर्माणाधीन इमारत PCMC कडून जमीनदोस्त (Watch Video))

वाकड परिसरातही कारवाई

अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मोहिमेबद्दल सांगताना पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर कारवाई पालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम आणि मनोज लोनकर (उपायुक्त) यांच्या आदेशान्वये करण्यात आली. चिखली पोलीस स्टेशनचे 12 अधिकारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 56 जवान यांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत ही कारवाई करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, आयपीसी सल्लागार सागर जाजिंद्रे आणि राजकुमार मलगुंडे हे ऑपरेशन टीमचा भाग होते. कारवाईदरम्यान तीन पोकलेन, एक जेसीबी आणि दोन वाहतूक ट्रकचा वापर करण्यात आला, असेही हे अधिकारी म्हणाले.