Cyclone Tauktae: बीकेसीच्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात हलवले, मंत्री नवाब मलिक यांची महिती
Nawab Malik (Photo Credits: ANI)

तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) मुंबईसह (Mumbai) शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. कोकण किनारपट्टीसह अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे आणि झाडांची पडझड झाली आहे. मुंबईत 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बीकेसी येथील जम्बो कोविड केअर सेंटरमधील (BKC Jumbo Covid Care Center) कोरोनाबाधित रुग्णांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.

मुंबईत बीकेसी येथील जम्बो कोविड रुग्णालयात सध्या 193 रुग्ण उपचार सुरु आहे. या ठिकाणी एकूण 73 रुग्ण आयसीयूत होते. या सर्व रुग्णांना महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जेणेकरुन त्यांच्या उपचारात खंड पडणार नाही, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाच्या परिस्थिती संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत केली चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ट्वीट-

तौत्के चक्रीवादळाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मागच्या तीन दिवसांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. जीवितहानी होऊ नये यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. आज अजित पवार हे स्वतः मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षात बसून तौक्ते वादळाच्या परिस्थितीची सगळी माहिती घेत होते. कोकणातील काही भागात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्याचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.