परभणी येथे अवैध दारु भट्ट्यांवर पोलिसांनी धाड टाकत 3 महिलांना घेतले ताब्यात
परभणी येथे अवैध दारु भट्ट्यांवर धाड (Photo Credits-Twitter)

सध्या देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांना पुरवल्या जातात. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात दारुची दुकाने, रेस्टॉरंट आणि बार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे तळीरामांची दारुची गैरसोय होत असल्याने ते आता दुकाने फोडून दारुची चोरी करत आहेत. त्याचसोबत राज्यातील विविध ठिकाणी चोरीछुप्या रितीने दारुची विक्री करण्यात येत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. याच पार्श्वभुमीवर परभणी येथील स्थानिक पोलिसांनी दारुच्या भट्ट्यांवर धाड टाकत तीन महिलांना ताब्यात घेतले आहे.

सेलु शहरातील स्थानिक पोलिसांनी शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास अवैध दारु भट्ट्यांवर धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांनी तीन महिलांना अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी सुद्धा अवैध पद्धतीने दारु बाळगल्या प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर महाराष्ट्र उत्पादन शुल्काने 2.82 कोटी रुपयांची दारु जप्त केली असून 1221 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 472 जणांना अटक करण्यात आली असून अवैध पद्धतीने दारु बाळगल्याप्रकरणी 36 गाड्या सुद्धा जप्त केल्या आहेत. याबाबत कांतीलाल उपम, महाराष्ट्र उत्पादन आयुक्त यांनी माहिती दिली आहे.(धक्कादायक! लॉकडाऊनच्या काळात भाजप आमदाराने वाढदिवसानिमित्त आयोजित केला धान्यवाटप कार्यक्रम; संचारबंदी असताना उसळली तुफान गर्दी)

कोरोना विषाणूसंदर्भात प्रत्येकाच्या मनात भितीनिर्माण झाली असून दारू आणि तंबाखूचे सेवन कराणाऱ्यांना याचा अधिक धोका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दारु आणि तंबाखूचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती होते. तसेच यामुळे संबंधित व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.