Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

Parambir Singh on Maharashtra Government: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलिसांचे निलंबित अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आला होता, असा दावा केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, मुंबईचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केलेल्या मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. (हेही वाचा - Maharashtra Politics: भाजप फक्त पैसा आणि ईडीच्या जोरावर जिंकला, सुप्रिया सुळेंचे वक्तव्य)

याशिवाय परमबीर सिंग यांनी असेही सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर काहींना महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चुकीच्या गोष्टींची माहिती दिली होती. ज्याबद्दल त्यांना सर्वांनाच माहिती होती. परमबीर सिंग यांनी सांगितले की, जेव्हा मी मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली होती.

परमबीर सिंग यांचा हा जबाब सीबीआयसमोर नोंदवण्यात आला असून बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे हे या प्रकरणात सरकारी साक्षीदार आहेत. त्यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे मानले जात आहे. परमबीर सिंग यांना महाराष्ट्र सरकारने निलंबित केल्यापासून ते चंदीगडमध्ये राहत असून चंदीगडमध्ये सीबीआयच्या चौकशीदरम्यान त्यांनी हा खुलासा केला होता. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि त्यांच्या अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले होते.