भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यांनी आज महाराष्ट्र भाजप (BJP Maharashtra) कार्यकारिणी यादी जाहीर केली, यावेळी बोलताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजप तर्फे केंद्रात लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा वेळी त्यांना महाराष्ट्रातील कामकाजात लक्ष घालणे शक्य होणार नसल्याने त्यांना इथे मोठी जबाबदारी दिलेली नाही मात्र त्या महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीच्या सदस्या नक्कीच असतील असेही पाटील यांनी सांगितले आहे. याशिवाय एकनाथ खडसे (Eknath Khadse) , प्रकाश मेहता (Prakash Mehta) ही मंडळी सुद्धा भाजप कार्यकारिणीच्या कोअर कमिटीचा भाग असतील असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, राज्यात भाजप महामंत्री पदी सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी राम शिंदे, जयकुमार रावळ, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हळवणकर, खा. प्रितम मुंडे, चित्रा वाघ, प्रसाद लाड, कपिल पाटील, भारती पवार यांच्यावर कार्यभार सोपवण्यात आला आहे. याशिवाय, विधानसभेत मुख्य प्रतोद आशिष शेलार, तर उप प्रतोद म्हणून माधुरी मिसाळ यांचे नाव ठरवण्यात आले आहे.
कुठलीही पूर्वसूचना न देता PM Narendra Modi CDS प्रमुख बिपीन रावत,आर्मी चीफ मनोज नरवणे लेह मध्ये दाखल - Watch Video
भाजप महाराष्ट्राच्या कार्यकारिणी यादीत प्रत्यक्ष पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे नाव नसल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी हा खुलासा केला. लवकरच पंकजा मुंडे यांना केंद्रात जबाबदारी देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले आहे.