संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोनाचे (Coronavirus) संकट वावरत असताना माणुसकीचे दर्शन घडवणारी माहिती समोर आली आहे. दक्षिण मुंबई (South Mumbai) येथे पाणी-पुरी विक्रेताचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, त्याच्या कुटुंबियातील सदस्यांना आर्थिक अडचणींचा सामोरे जावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित पाणी-पुरी विक्रेताच्या नियमित ग्राहकांनी त्याच्या कुटुंबियांना आर्थिक हातभार लावण्यासाठी निधी जमा करण्याची मोहीम राबवत आहेत. या मोहीमेतून मिळालेला पैसा त्याच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याचे समजत आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. हे देखील वाचा- Mission Universal Testing: मुंबई महानगरपालिका राबवणार 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग' उपक्रम; आता 30 मिनिटात होणार कोरोनाचे निदान
पीटीआयचे ट्वीट-
Pani-puri seller in south Mumbai dies of #COVID19, some of his regular customers launch fundraising campaign to help his family
— Press Trust of India (@PTI_News) June 25, 2020
मुंबईत बुधवारी संध्याकाळपर्यंत 1 हजार 144 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 38 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 69 हजार 625 वर पोहचली आहे. यापैंकी 3 हजार 962 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 37 हजार 10 जणांना कोरोनावर मात केली आहे.