File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळून आले आहेत. ज्यामुळे प्रशासनापुढे कोरोनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे. मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग (Mission Universal Testing) असे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमाच्या मदतीने आता केवळ 30 मिनंटात कोरोनाचे निदान होणार आहे. ज्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार सुरु करता येणार आहे.

मुबंईत कोरोनाचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग उप्रकम हाती घेतले आहे. या उपक्रम अंतर्गत अवघ्या अर्ध्या तासात कोरोनाची चाचणीचा अहवाल मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेने ऍन्टीजेन टेस्टिंगच्या 1 लाख किट खेरदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार, रॅपिड टेस्टिंग कीट खरेदी करून आपल्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यास कॉर्पोरेट हाऊस, खाजगी कंपन्यांनाही सुचवण्यात आले आहे. हे देखील वाचा- मुंबईमधील कोरोना व्हायरस Peak कदाचित निघून गेला असेल; पण मान्सून, अनलॉकींग व संसर्गाचे नवे परिसर ही चिंता कायम- State Task Force प्रमुख डॉ. संजय ओक

मुंबई महानगरपालिकेचे ट्विट-

मुंबईत मंगळवारी 846 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 42 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 68 हजार 481 वर पोहचली आहे. यापैंकी 3 हजार 842 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 34 हजार 576 जणांना कोरोनावर मात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.