घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी आणि अनिष्ट प्रवृत्तींना दूर करत असल्याचं सांगत 35 वर्षीय महिलेवर अनेकदा बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई करत 5 जणांना अटक केली आहे. ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) मधून बलात्काराच्या (Rape) आरोपाखाली आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी बेड्या ठोकलेले 5 आरोपी हे पीडीतेच्या नवर्याचे मित्र आहेत. त्यांनी तिला सांगितले की तिच्या पतीच्या मागे काही अनिष्ट लागलं आहे. ते दूर करायचं असेल तर तुम्हांला या 'रीतींमध्ये' सहभाग घ्यावा लागेल.
एप्रिल 2018 पासून अनेकदा हे आरोपीकडे पीडीतेच्या घरी आले आहेत. ती एकटी असल्याचं पाहून त्यांनी 'रीती' करत असल्याचं सांगितलं. 'पंचामृत' आहे सांगून तिला काही पाणी दिलं जात होतं त्या गुंगीमध्ये महिलेवर बलात्कार केला जात होता.
आरोपींनी रीती भाती पूर्ण करण्यासाठी पीडीतेकडून सोनं, पैसा घेतला. या सार्याच्या बदल्यात घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल तसेच पतीला सरकारी नोकरी मिळेल असेही सांगितलं.
ठाण्याच्या येरूर जंगलामध्ये पहिल्यांदा महिलेवर बलात्कार झाला. नंतर लोणावळा मध्येही एका रिसॉर्ट वर जाऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. यावेळी तिच्याकडून 2.10 लाख रूपये आणि सोनं घेण्यात आलं.
तलासरीच्या ग्रामीण भागातून एका भागातून महिलेने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. 11 सप्टेंबर नंतर पोलिसांनी रविंद्र भाटे, दिलीप गायकवाड, गौरव साळवी, महेंद्र कुमावत, गणेश कदम यांना अटक केली. पोलिस सध्या या आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची पुनरावृत्ती इतरही कुठे केली होती का? याचीदेखील तपासणी करत आहेत.
पालघरचे Superintendent of Police Balasaheb Patil यांनी जारी पत्रकामध्ये पाचही आरोपींवर कलम 376, 376(2)(n),420 अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गतही कारवाई केली जात असल्याचं म्हटलं आहे.