Maharashtra: पालघर येथे 4.93 कोटी रुपयांची वीज चोरी करणाऱ्या 5 जणांच्या विरोधात कारवाई
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

Maharashtra: पालघर येथे कथित रुपात वीजेची चोरी करणाऱ्यांच्या विरोधा कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी 4.93 कोटी रुपयांची वीज चोरी केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याबद्दल एमसईडीसीएल अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडचे पीआरओ विजय दुधाडे यांनी या प्रकरणी विरार पोलीस स्थानकात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.(Mumbai Cyber Crime: मुंबईतील व्यक्तीला ऑनलाईन दारु मागवणे पडले महागात, दुकानातील कर्मचारी सांगत अज्ञाताकडून 3.45 लाखांची फसवणूक)

आयस्क्रिम फॅक्टरीचे चार निर्देशक आणि एक व्यक्ती ज्याने वीज चोरी करण्यास मदत केली त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर 30 ऑक्टोंबरला एमएसईडीसीएच्या टीमने अचानक त्या ठिकाणी भेट दिली. तेव्हा त्यांना तेथे काही वस्तू आढळल्या.(Bhiwandi Crime: भिवंडीमध्ये प्रेयसीजवळ बोलू न दिल्याने मुलीच्या वडिलांवर प्रियकराचा हल्ला, आरोपीस अटक)

टीमला घटनास्थळी रिमोट कंट्रोल आणि अन्य उपकरणे मिळाली जी वीजेच्या वापरासंबंधित वापरली जातात. गेल्या 59 महिन्यात कंपनीने 27,84,364 अधिक युनिट्स वीज वापरली होती. ज्याची किंमत 4,93,98,460 रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विरार पोलिसांनी असे म्हटले की, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.