खुशखबर! उस्मानाबाद जिल्हा झाला कोरोना मुक्त; सर्व रुग्णांची चाचणी निगेटिव्ह
Osmanabad Corona Free (Photo Credits: Wikicommons, Unspalsh)

महाराष्ट्रात कोरोनाचे (Coronavirus In Maharashtra) सर्वाधिक रुग्ण आणि सर्वात जास्त बळी गेले असताना आता कुठेतरी राज्यातील एका जिल्ह्यातून दिलासादायक वृत्त समोर येत आहे. राज्यातील उस्मानाबाद (Osmanabad) हा जिल्हा संपूर्णतः कोरोनामुक्त (Corona Free) झाला असून राज्यातील तिन्ही कोरोना रुग्णांची चाचणी आता निगेटिव्ह आली आहे. यामुळे उस्मानाबाद हा जिल्हा आता ग्रीन झोन (Green Zone) म्हणजेच कोरणामुक्त झोन मध्ये समाविष्ट झाला आहे. याबाबत उस्मानाबादच्या जिल्हा माहिती व जनसंपर्क कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा COVID-19 पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्हानिहाय यादी

प्राप्त माहितीनुसार, उस्मानाबाद मधील कोरोनाचे 3 रुग्ण हे 28 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान सापडले होते. त्यापैकी 2 जण हे दिल्ली येथून आले होते. तर एक जण हा मुंबई येथील हॉटेल ताजमधून आला होता.उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या तिन्ही रुग्णांची लेटेस्ट कोरोना चाचणी हि निगेटिव्ह आली आहे. तर, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 85 नागरिकांची चाचणी सुद्धा निगेटिव्ह आहे. सोबतच मागील एक आठवड्यात कोरोनाचा एक ही नवा रुग्ण उस्मानाबाद मध्ये आढळलेला नाही त्यामुळे कोरोनाला पळवून लावण्यात यश आल्याचे म्हणता येईल. गोवा येथील सर्व कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह, मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दरम्यान, उस्मानाबादला लागूनच असलेल्या लातूर जिल्ह्यानेही कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. मात्र खबरदारीचा पार्याय म्ह्णून ३ मे पर्यंत लागू करण्यात आलेल्या लॉक डाउनच्या नियमाचे पालन करण्यात यावे असे आदेश उस्मानाबाद व लातूरच्या जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.