Coronavirus Lockdown: ट्रेन चालू होणार या प्रकारची अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल - अनिल देशमुख
Home Minister Anil Deshmukh | Photo Credits: Facebook)

Coronavirus Lockdown: महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 3 में पर्यंत लॉकडाऊन घोषित केलं. देशात लॉकडाऊन स्थिती असताना अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. सध्या ट्रेन चालू होणार (Trains Will Start) या प्रकारची अफवा (Rumour) पसरविण्यात येत आहे. ही अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी निर्देश दिले आहेत.

सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी रेल्वे काही पार्सल गाड्या चालवण्यात येत आहेत. अद्याप इतर कोणत्याही रेल्वे वाहतूकीला सुरुवात झालेली नाही, असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - गुजरात: काँग्रेस आमदार इमरान खेडावाला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह ; 14 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

देशात 3 में पर्यंत प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात आली असल्याचं भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांने सांगतले आहे. दरम्यान देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी माल वाहतूक चालू राहणार आहे. देशातील सर्व मेल, एक्स्प्रेस, मेट्रो, लोकल या सर्व सेवा 3 मे 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे येणार असल्याचे पत्रकगी रेल्वे विभागाने जारी केलं आहे.