Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024
ताज्या बातम्या
6 minutes ago

इंदोरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 411 वर पोहोचली तर आतापर्यंत 37 जणांचा कोरोनामुळे बळी ; 14 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Poonam Poyrekar | Apr 14, 2020 11:52 PM IST
A+
A-
14 Apr, 23:51 (IST)

इंदोरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 411 वर पोहोचली तर आतापर्यंत 37 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

 

14 Apr, 22:58 (IST)

आज सकाळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भेट घेतलेले कॉंग्रेसचे आमदार इमरान खेडावाला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

14 Apr, 22:36 (IST)

ट्रेन चालू होणार या प्रकारची अफवा ज्यांनी पसरविली त्याबद्दलचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यासदंर्भात चौकशी करून अफवा पसरविणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

14 Apr, 22:16 (IST)

Coronavirus: बांद्रा येथे घडलेल्या घटनेसंदर्भात 800-1000 अज्ञात लोकांविरोधात, आयपीसी कलम 143, 147, 149, 186, 188 अन्वये बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14 Apr, 21:58 (IST)

पुणे शहरात आज नवे 44 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 324 वर पोहोचली आहे.

 

14 Apr, 21:53 (IST)

कोरोना बाधित गर्भवती महिलेच्या संपर्कात आलेल्या पुण्यातील सोनवणे प्रसूती गृहातील 17 आरोग्य कर्मचारी 3 डॉक्टरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

 

14 Apr, 20:59 (IST)

कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात एका दिवसात 18 लोकांचा मृत्यू झाला असून 350 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत 2 हजार 684 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे एकूण 178 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच यापैकी 259 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एएनआयचे ट्वीट- 

 

 

14 Apr, 20:39 (IST)

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबई आणि पुण्यात आढळून आले आहेत. यामुळे दोन्ही शहरात कोरोना तपासणी केंद्र वाढवले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

 

14 Apr, 20:28 (IST)

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान, त्यांनी कोरोना संदर्भात त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.  लॉकडाउनच्या काळात शेती विषयक काम थांबणार नाही. तसेच शेती मालाचे दुकानेही सुरु राहणार आहेत. आपण कोरोनाला गांभीर्याने घेत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच मुंबईत आतापर्यंत 20 ते 25 हजार कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 10 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, कोरोनानंतर राज्याला अर्थिक संटकाचा सामना करावा लागणार, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. महत्वाचे म्हणजे, कोरोनाचे संकटावर आपण विजय मिळवणारच, असा विश्वासही त्यांनी दर्शवला आहे. 

14 Apr, 20:06 (IST)

दरवर्षी नियमितपणे 14 एप्रिलला भिमसैनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येत गर्दी करतात. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी भिमसैनिकांनी गर्दी न करता घरातच जयंती साजरी केली आहे. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिमसैनिकांचे आभार मानले आहेत.

Load More

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. आज या लॉकडाऊनचा 21 वा दिवस आहे. हा लॉकडाऊन कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आला होता. मात्र लोकांच्यया बेजबाबदारपणामुळे ही संख्या देशात वाढतच गेली. ज्याचा परिणाम भारतात गेल्या 24 तासात 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 51 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 9352 वर पोहोचली आहे. हा आकडा खूपच धक्कादायक असून याचे अनेक गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील. इटली, अमेरिका यांसारख्या देशांसारखी आपली अवस्था होऊ नये म्हणून आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.

या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मोदी अनेक महत्त्वाच्या घोषणा करतील. त्याशिवाय देशातील सद्य स्थिती पाहता लॉकडाऊन वाढण्याची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. देशातील उद्योगधंदे, अर्थव्यवस्था या सर्व महत्त्वाच्या गोष्टींबाबत नरेंद्र मोदी काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज काही महत्त्वाच्या घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. पंतप्रधान मोदींच्या कॉन्फरन्सवर उद्धव ठाकरे काही निर्णयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 352 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आणि 11 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सकारात्मक घटनांची संख्या 2334 वर पोहचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.


Show Full Article Share Now