Photo Credit - X

Mumbai High Tide TimingToday: बृहमंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या समुद्रात आज 15 जुलै रोजी संध्याकाळी 5.57 वाजता 3.34 मीटरच्या लाटा उसळतील. तसेच 12.15 वाजता 2.51 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असे सांगण्यात आले आहे. त्याशिवाय, 16 जुलै रोजी सकाळी 00:56 वाजता अरबी समुद्रात 1.50 मीटर कमी भरती असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईसाठी पुढील 36 तास महत्त्वाचे आहेत. या काळात 200 मिमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या पश्चिम उपनगरांवर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा: Gorakhpur LTT Express Brake Liner Fire: गोरखपूर एलटीटी एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग; ठाकुर्ली स्थानकाजवळ घडली घटना)

पोस्ट पहा

पावसाने आठवड्यात दमदार हजेरी लावल्याने शहर आणि उपनगरांमध्ये विक्रमी टप्पा पार केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत शहराने 1,000 मिमी पावसाचा टप्पा ओलांडला आहे. आयएमडी (IMD) ने म्हटले आहे की, ताज्या आकडेवारीनुसार, कुलाबा स्टेशनवर 1,074.6 मिमी आणि सांताक्रूझ स्टेशनवर 1,089.21 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आनंदाची बातमी अशी की, वरुणराजा मनसोक्त बरसत असल्याने मुंबई शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्येही पाण्याचा साठा वाढला आहे.

अलीकडील पाऊस आणि अंदाज

गेल्या 24 तासांत कुलाबा येथे 58 मिमी, तर सांताक्रूझमध्ये 38.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तर-पश्चिम मान्सून प्रवाह मजबूत झाल्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान अंदाज अभ्यासणाऱ्या तज्ज्ञांनी वर्तवली आहे.