महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले असून राज्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन तसेच बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gailwad) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. यावर आता स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल म्हणून ते तसे बोलले असतील', असा शब्दात फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की, संजय गायकवाड यांची रात्रीची उतरली नसल्यामुळे त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली असेल. त्यांना माझ्या तोंडात कोरोना विषाणू टाकायचे असेल तर त्यांनी नीट मास्क व हॅन्डग्लोस घालावे कारण रात्रीची घेणाऱ्यांसाठी कोरोना विषाणू अधिक घातक असतो, अशा शब्दांत फडणवीस यांनी गायकवाड यांना सणसणीत टोला लगावला आहे. हे देखील वाचा- Mumbai: भांडूप, पवई आणि कांजूरमार्ग येथील अत्यावश्यक सेवासुविधांची दुकाने 19 एप्रिल पासून 'या' वेळेत सुरु राहणार
कोरोना संसर्गावरून संजय गायकवाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. तसेच केंद्र सरकारमुळे लाखो लोकांना आपले प्राम गमवावे लागतील, त्याचे काय? कोरोनामुळे ज्या घरातला माणूस मरण पावतो त्यांनाच समजते की कोरोना काय आहे? मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर, मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते. अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाला आहे.