महाराष्ट्रातील इयत्ता 9 वी आणि 11 वी मधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा उत्तीर्ण होण्याची संधी; तोंडी परीक्षेच्या आधारे विद्यार्थी जाणार पुढील वर्गात
Education Minister Varsha Gaikwad (PC - MahaDGIPR)

राज्यामध्ये इयत्ता 9 वी आणि 11 वी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी= (Failed Student) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा उत्तीर्ण होण्याची संधी देण्यात येत आहे. शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबत माहिती दिली. राज्यातील इ. 9 वी व इ. 11 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे तोंडी परीक्षा घेऊन, यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय आज घेण्यात आला आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांचे नुकसान न होता त्यांना अजून एक संधी प्राप्त होणार आहे. म्हणजेच आता तोंडी परीक्षेच्या आधारे हे विद्यार्थी पुढील वर्गात जाती.

याबाबत सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. शासन निर्णयामधील तरतुदीनुसार, इ. 10 वी मधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी दिली जाते, त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये इ.9 वी मध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जून, 2018 मध्ये पुनर्परीक्षेची संधी देण्यात आली होती. मात्र सध्या चालू वर्षी कोरोन व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर 9 वी च्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेणे शक्य होणार नाही. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी इ.9 वी व इ.11 वी च्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होण्याची एक संधी दिली जाणार आहे.

(हेही वाचा: महाराष्ट्रात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शिकवण्या सुरु करण्याची Coaching Classes ची मागणी; 25,000 रुपयांच्या आर्थिक पॅकेजसह सरकारसमोर मांडल्या ‘या’ मागण्या)

वर्षा गायकवाड ट्वीट -

शैक्षणिक वर्ष सन 2019-20 मध्ये इ. 9 वी व इ. 11 वी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना चालू वर्षात तोंडी पुनर्परीक्षेची संधी देण्यात येणार आहे. कोविड—19 मुळे सदर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा 7 ऑगस्ट, 2020 पर्यंत घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत प्रत्यक्ष बोलावून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबंधित शाळांनी तोंडी परीक्षा घेण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. या तोंडी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना, शैक्षणिक वर्ष सन 2020-21 मध्ये सुरु होणाऱ्या 10 वी व 12 वीच्या वर्गात प्रवेश मिळेल.