राज्यात 15 मे पासून 9 लाख 47 हजार 859 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री (Home Delivery) करण्यात आली आहे. तसेच आज दिवसभरात 59 हजार 498 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली. यापैकी मुंबई शहर, मुंबई उपनगरात 34 हजार ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सांगितले आहे.
राज्यात 7261 मद्यविक्री दुकाने सुरु करण्यात आली आहेत. 1 मे पासून 1 लाख 10 हजार 763 ग्राहकांना मद्यसेवन परवाने मंजूर करण्यात आले आहेत. अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत 7225 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 3344 आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली असून 18 कोटी 67 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (हेही वाचा - मुंबईत कोरोना व्हायरसचा हाहाकार! दिवसभरात 53 जणांचा मृत्यू तर 1150 नव्या कोरोना रुग्णांची भर)
राज्यात १५ मे पासून ९ लाख ४७ हजार ८५९ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री. दिवसभरात ५९ हजार ४९८ ग्राहकांना घरपोच मद्य, यापैकी मुंबई शहर, मुंबई उपनगरात ३४ हजार ग्राहकांना घरपोच मद्यविक्री- उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती pic.twitter.com/gIdSrtvDBh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 5, 2020
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत पाच वेळा लॉकडाऊनचा काळावधी वाढवला आहे. लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठं नुकसान झालं. त्यामुळे तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये दारूची दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. परंतु, नागरिकांची दारूसाठी झुंबड पाहून सरकारने ऑनलाईन मद्यविक्रीस परवानगी दिली. त्यामुळे सध्या नागरिकांनी दारूच्या दुकानांसमोर रांगा न लावता ऑनलाईन मद्य खरेदीस जास्त पसंती देत आहेत. मद्यविक्रीमुळे सरकारला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला आहे.