मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) हाहाकार माजला आहे. मुंबईत आज दिवसभरात 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1150 नव्या कोरोना रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 45,854 वर पोहोचली आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत 1518 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईमध्ये आढळून येत आहेत. मुंबईतील अनेक ठिकाण सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. या ठिकांणांहून जास्तीत-जास्त लोकांना कोरोनाचे संक्रमण होत आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्ण संख्या मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. (वाचा - Coronavirus Updates: मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे नवे 20 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1889 वर पोहचला)
Mumbai reports 1150 new #COVID19 positive cases and 53 deaths. The total number of positive cases in Mumbai reaches 45854; death toll stands at 1518: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/FNIBgVDW9y
— ANI (@ANI) June 5, 2020
मुंबईतील धारावी परिसरात आज 20 नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे धारावीत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1889 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत धारावीत 71 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज राज्यात 139 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात 2436 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 80,229 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2849 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 35,156 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे.