Coronavirus Updates: मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे नवे 20 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1889 वर पोहचला
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने येत्या 20 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु लॉकडाऊनच्या 5.0 मध्ये काही नियम शिथील करण्यात आले असून Unlock 1 अंतर्गत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु यावेळी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. याच दरम्यान आता मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) आज कोरोनाचे नवे 20 रुग्ण आढळून आल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे धारावीत एकूण कोविड19 च्या रुग्णांचा आकडा 1889 वर पोहचला असून आतापर्यंत 71 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहे. त्याचसोबत राज्य सरकार सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. कोरोनाग्रस्तांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध ठिकाणी क्वारंटाईन आणि आयसोलेशन सेंटर सुद्धा उभारण्यात आले आहेत. तर धारावीत सुद्धा कोरोनाबाधितांसाठी एक नवे रुग्णालय सुरु करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.(महाराष्ट्रात गेल्या 24 तासात पोलीस दलातील 4 जणांना कोरोनाची लागण तर एकाचा मृत्यू, एकूण COVID19 चा आकडा 2561 वर पोहचला)

दरम्यान, महाराष्ट्रात आज कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण 2436 आढळून आले असून 139 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 80229 वर पोहचला आहे. त्यापैकी 2849 जणांचा कोविड19 मुळे बळी गेला असून अद्याप 35156 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.