Central Government Stops Onion Export: जगभरात लॉकडाऊन असताना शेतीत खपून मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती. परंतु, केंद्राने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, बाजारात मागील काही दिवसांत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले होते. मात्र, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने अचानक निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांनाही मोठा फटका बसला आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Solapur Boramani Airport: सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी 50 कोटींचा निधी मंजूर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश)
The @narendramodi govt has done injustice to the farmers by suddenly banning #Onion exports. @INCMaharashtra has launched a statewide agitation on Wednesday, September 16, to demand the immediate lifting of the export ban.@RahulGandhi @INCIndia @kcvenugopalmp @HKPatil1953
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 15, 2020
कांद्याचा दर वाढत असल्याचे आशादायी चित्र बाजारात दिसत असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पल्लवीत झालेल्या आशा धुळीस मिळविल्या आहेत. प्रधानमंत्री यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.