Sushant Singh Rajput Suicide Case: अनेकदा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात; देवेंद्र फडणवीस यांचं खळबळजनक वक्तव्य
Devendra Fadnavis (PC - ANI)

Sushant Singh Rajput Suicide Case: भाजपचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणासंदर्भात खळबळजनक विधान केलं आहे. अनेकदा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. तसं त्यांनी करू नये, अशी आमची अपेक्षा आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे.

यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘जनतेने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. म्हणूनचं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. मात्र, मी महाराष्ट्र पोलिसांसोबत 5 वर्ष काम केलं आहे. त्यांची क्षमता मला पूर्णपणे माहिती आहे. महाराष्ट्राचे पोलीस उत्तम काम करत आहेत, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे’, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या शवविच्छेदन रिपोर्टवर वकील विकास सिंह यांनी मृत्यूची वेळ न दिल्याने उपस्थितीत केला प्रश्न)

यावेळी फडणवीसांनी शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत अनेक गोष्टी बोलत असतात. मात्र, ते बोलत असलेल्या सगळ्याचं गोष्टी खऱ्या थोडी असतात, असा टोलाही यावेळी फडणवीसांनी लगावला. याशिवाय महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत वाद असल्याचा दावीदेखील यावेळी केला.