आता मुंबई शहरातीत दुषित पाणीप्रश्न सुटणार अवघ्या 24 तासांत; रात्रपाळीत काम करा, ज्यादा कामगार घ्या- राज्य सरकारचा आदेश
प्रातिनिधिक प्रतिमा (photo Credit : pixabay)

अजूनतरी महाराष्ट्रात मान्सूनचे पूर्णतः आगमन झाले नाही, मात्र सर्वत्र मान्सूनपूर्व सरी कोसळल्या आहेत. अजूनही मुंबईमधील (Mumbai) तलावांची पातळी खालावलेलीच आहे. अशा परिस्थित मुंबईमध्ये दुषित पाणीपुरवठा (Infectious Water) होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत सरकारने कडक पावले उचलत, रात्रपाळीत काम करा, ज्यादा कामगार घ्या, पण दूषित पाण्याचा प्रश्न 24 तासांत निकाली काढा असा आदेश दिला आहे. या आदेशानंतर मुंबईला 100 टक्के शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

मुंबईमध्ये झोपडपट्ट, घरे तसेच अनेक सोसायटीमधील पिण्याच्या पाईपलाइन्स गटारातून गेल्या आहेत. शहरात थोडासा जरी पाऊस झाला तरी दुषित पाणी पुरवठा सुरु होतो. यामुळे कावीळ, गॅस्ट्रो अशा रोगांची लागण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अनेक नागरीकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर उपाययोजना म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी या दुषित पाण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

आता राज्य सरकाने दिलेल्या आदेशानंतर, 24 तासांत दुषित तसेच गढूळ पाण्याचा प्रश्ग्न निकाली लागणार आहे. यासाठी अनेक ठिकाणी टनेल उभा केले जाणार आहेत. पाईपलाइन्स बदलल्या जाणार आहेत. गोरेगाव येथील उन्नतनगर, प्रेमनगर, समतानगर या ठ्कानाहून दुषित पाण्याचा अनेक तक्रारी आल्यानंतर आताप्रशासन यावर उपाययोजना करणार आहे. (हेही वाचा: दुष्काळात दुषित पाण्याचा तेरावा महिना; नगर जिल्ह्यात 124 गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा, दापोली तालुक्यात 34 जणांना रोगाची लागण)

दरम्यान, नुकत्याच झालेल्या परीक्षणामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 124 गावांना एप्रिल महिन्यात दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दापोली तालुक्यातही दुषित पाण्याने 34 जणांना डेंग्यू, अतिसार, ताप, डोकेदुखी यांची लागण झाली आहे. या सर्वांवर दापोली इथे उपचार सुरु होते. तालुक्यातील काही गावांमध्ये दोन आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतो, यात दुषित पाणी पुरवठा झाल्याने रोगराई पसरली.