 
                                                                 कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता संसर्ग यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविड-19 (Covid-19) झालेला रुग्णासह त्याच्या नातेवाईकांची काळजी वाढते. पुरेशी माहिती नसल्यामुळे गोंधळ निर्माण होऊन अस्वस्थता निर्माण होते. हीच बाब लक्षात घेत नागपूर महानगरपालिकेने (Nagpur Municipal Corporation) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) लोककल्याण समितीनसह (Lok Kalyan Samiti) 'मिशन विश्वास' (Mission Vishwas) अभियान सुरु केले आहे. या योजनेअंतर्गत कोरोना बाधित रुग्ण, त्याचे नातेवाईक यांचे समुपदेशन करतात. तसंच कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध म्हणजेच कॉन्टट ट्रेसिंगसाठी (Contact Tracing) देखील मदत केली जाते. (महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ 'या' जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी)
आम्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना संपर्क करतो, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना ट्रेस करतो आणि चाचणी करण्याचा सल्ला देतो. अधिकाधिक लोकांनी चाचण्या कराव्या हे आमचे उद्देश आहे. आम्ही स्वयंसेवकांना कॉऊन्सलिंगचे प्रशिक्षण दिले आहे. तसंच कोरोना बाधित रुग्णांना वैद्यकीय सल्ला देण्याचीही सोय केली आहे. तसंच त्यांच्या इतर गरजाही पूर्ण होतील याची काळजी घेतली जाते, असे मिशन विश्वासच्या प्रमुखांनी सांगितले आहे.
ANI Tweet:
Maharashtra: Nagpur Municipal Corporation in association with Rashtriya Swayamsevak Sangh's Lok Kalyan Samiti has launched ‘Mission Vishwas’ in Nagpur, to help counsel #COVID19 patients and their family members, and in contact-tracing pic.twitter.com/WwEuyiCSqB
— ANI (@ANI) September 5, 2020
दरम्यान सध्या राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 863062 वर पोहचली आहे. त्यापैकी 210978 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 625773 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण 25964 कोरोनाग्रस्त रुग्णांचा बळी गेला आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
