नितीन गडकरी पंतप्रधान होणार? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु
नितीन गडकरी (फोटो सौजन्य-फेसबुक)

आगामी लोकसभा निवडणुक 2019 (Lok Sabha Election 2019) साठी सर्व राजकीय पक्षातून जोरदार तयारी सुरु झाली आहे. तसेच या वेळी नेमकी कोणाची सत्ता येईल याबाबात ही सर्वत्र बोलले जात आहे. मात्र नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे देशाते पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी सांगण्यात आली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत.

ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी ग्रह आणि पत्रिकेच्या आधारावर ही भविष्यवाणी केली आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत भाजप पक्षाला बहुमत मिळणार नसल्याने त्यांना मित्रपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापन करावी लागणार आहे. तर गडकरी यांच्या पत्रिकेनुसार त्यांना 2019 च्या निवडणुकीसाठी मोठी संधी असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांतच निवडणुकीची तारिख जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) विरुद्ध भाजप पक्ष (BJP) यांच्यामधील चुरस पाहण्याजोगे ठरणार आहे. तसेच कोणत्या पक्षाला बहुमत मिळते याकडे सुद्धा जनतेचे लक्ष लागून राहीले आहे.(हेही वाचा-आगामी लोकसभा निवडणुक शरद पवार लढवणार नाहीत?)

तर यंदाच्या निवडणुकीत गडकरी पंतप्रधान पदाचा भार स्विकारणार अशी भविष्यवाणी अमरावती येथील भविष्य परिषदेने केली आहे. तसेच निवडणुकीपूर्वीच पंतप्रधान गडकरी होतील या भविष्यवाणीमुळे राजकीय पक्षात निवडणुकीबबात काय प्रतिक्रिया येतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.