भाजप (BJP) आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी (Nitesh Rane to Police Custody) मिळाली आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात (,Santosh Parab Attack Case) न्यायालयाच्या आदेशानुसार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज अचानक मागे घेत नितेश राणे सिंधुदुर्ग दिवानी कोर्टासमोर शरण आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) ठोठावण्यात आली.
नितेश राणे यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारी पक्षाचे वकील प्रदीप घरत यांनी माहिती दिली. ही माहिती देताना घरत यांनी सांगितले की, नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून जे 10 दिवसांचे संरक्षण दिले होते. हे संरक्षण आरोपी जेव्हा न्यायालयाला शरण आले तेव्हाच संपले. त्यामुळे न्यायालयाने सुरुवातीला जी न्यायालयीन कोठडी दिली होती ती केवळ आरोपी शरण आल्यानंतर त्याला कोठे ठेवायचे हा प्रश्न निर्माण झाल्याने दिली होती. मात्र, आम्ही सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना पोलीस कोठडी दिली, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. (हेही वाचा, Nitesh Rane Surrender: शरण आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी)
अॅड. प्रदीप घरत यांनी पुढे बोलताना सांगितले, न्यायालयाकडे आम्ही नितेश राणे यांची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, याच प्रकरणातील दुसऱ्या आरोपीची पोलीस कोठडी 4 तारखेला समाप्त होती आहे. त्यामुळे राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. येत्या चार फेब्रुवारीला नितेश राणे यांना आणि याच प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला कोर्टासमोर हजर केले जाईल. त्यानंतर आम्ही दोघांचीही पोलीस कोठडी वाढवून मागू असेही सरकारी वकील प्रदीप घरत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग न्यायालयाला आज (2 फेब्रुवारी) सिंधुदुर्ग न्यायालयात शरण आले. नितेश राणे शरण आल्यानंतर न्ययालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, सरकारी पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राणे यांना पोलीस कोठडी सुनावली. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी स्वत: याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना 'आपण न्यायालयाला शरण जाण्यासाठी निघालो आहोत', असे म्हटले. नितेश राणे यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने काल (1 फेब्रुवारी) अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, आज (2 फेब्रुवारी) त्यांनी दाखल केलेला अर्ज अचानक मागे घेतला. नितेश यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ही माहिती दिली. त्यानंतर नितेश न्ययालयासमोर शरण जाण्याचा निर्णय घेतला.