भाजप (BJP) आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग न्यायालयाला (Sindhudurg Sessions Court) आज (2 फेब्रुवारी) शरण आले आहेत. नितेश राणे शरण आल्यानंतर न्ययालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी स्वत: याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना 'आपण न्यायालयाला शरण जाण्यासाठी निघालो आहोत', असे म्हटले. नितेश राणे यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने काल (1 फेब्रुवारी) अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, आज (2 फेब्रुवारी) त्यांनी दाखल केलेला अर्ज अचानक मागे घेतला. नितेश यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ही माहिती दिली. त्यानंतर नितेश न्ययालयासमोर शरण जाण्याचा निर्णय घेतला.
नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, 'सर्वोच्च न्ययालयाने नितेश राणे यांना दिलेले पाच दिवसांचे संरक्षण शिल्लख असतानाही ते तपास अधिकाऱ्यांसमोर शरण जात आहेत. त्यामुळे हयकोटात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेण्यात येत आहे. आता त्याना पोलीस तपासाला सामोरे जाण्याची इच्छा असल्याचेही' सतिश मानेशिंदे यांनी म्हटले. (हेही वाचा, Nitesh Rane कणकवली दिवाणी न्यायालयात शरण; जामिन अर्ज घेतला मागे )
काय आहे प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीवेळी महाविकासआघाडीचे प्रचारप्रमुख शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. हा हल्ला 18 डिसेंबर रोजी झाला होता. या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर हल्ल्याचा आरोप आहे. आतापर्यंत या प्रकरणात हल्ला करणारा प्रमुख आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलीसांनी दिल्ली येथून अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने नितेश राणे यांचे नाव घेतले. त्यानंतर कणकवली पोलिसांनी नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, दाखल गुन्ह्यात अटक होणार अशी शक्यता असल्याने नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात याचिका दाखल केली. मात्र, सिंधुदुर्ग सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशा तिन्ही कोर्टात त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता ते सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाला शरण गेले आहेत.