Nitesh Rane | File Photo

संतोष परब हल्लाप्रकरणी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court)  जामिनासाठी अर्ज केला होता मात्र आता त्यांनी तो जामिन अर्ज मागे घेतला असून कोर्टात शरण जाण्यासाठी तयारी दर्शवली आहे. सध्या ते कोर्टाच्या दिशेने दुपारी  रवाना झाले. आता कणकवली दिवाणी कोर्टात ते शरण आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी आपण कोर्टाच्या निकालाचा मान राखतो असं म्हणत माघार घेतली आहे.

दरम्यान कोर्टात जाण्यापूर्वी नितेश राणे यांनी ट्वीट केले आहे. हे सूचक ट्वीट असून यामध्ये 'वेळ' बलवान असते माणसं उगाच गर्व बाळगतात असं म्हटलं आहे. आता कोर्टात शरण झाल्यानंतर नितेश राणे यांना अटक होणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. सध्या कणकवली दिवाणी कोर्ट परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे.  सर्वोच्च न्यायालयाने भाजपा आमदार नितेश राणे यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण 27 जानेवारीला  दिले आहे. त्यामुळे आता त्यांना अटकेपासून संरक्षण मिळणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष आहे.

नितेश राणे ट्वीट

ANI Tweet

काय आहे प्रकरण?

संतोष परब यांच्यावर 18 डिंसेबरला कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान भाजपा कडून प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देताना राज्य सरकार मुद्दामून राणेंना टार्गेट करत असल्याचं म्हटलं आहे. नितेश राणे यांच्यावर कलम 307, 120 बी आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.