Nisarga Cyclone Helpline Numbers: निसर्ग चक्रीवादळ (Nisarga Cyclone) आज, 3 जून रोजी दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबाग (Alibaug) येथून जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तत्पूर्वी या वादळी वाऱ्यांमुळे मुंबईत सुद्धा मुसळधार पावसाला (Heavy Rains) सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळेत सुद्धा पाऊस कायम असण्याची शक्यता आहे. किनारपट्टीलगत भागात आज समुद्राच्या भरतीमुळे परिस्थीती आणखीन बिघडू शकते. नागरिकांंनी बाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. अगदी अत्यावश्यक कारण असल्यास बाहेर जाण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत मुंंबई महापालिकेच्या (BMC) वतीने सुचनावली जाहीर करण्यात आली आहे.यावेळेत आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महाराष्ट्र मंत्रालय निरीक्षण कक्ष, बीएमसी आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra Congress) वतीने काही हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत. यावर संपर्क साधून तुम्ही मदत मिळवू शकाल. निसर्ग चक्रीवादळाचे क्षणोक्षणीचे अपडेट जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्र मंत्रालय निरीक्षण कक्ष हेल्पलाईन क्रमांक
आपत्कालीन मदतीसाठी #मंत्रालय नियंत्रण कक्षाचा
संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे-
022- 22027990
022-22023039
9321587143
9321590561@PIBMumbai @MahaDGIPR
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) June 3, 2020
महाराष्ट्र काँग्रेस हेल्पलाईन क्रमांक
#NisargaCyclone च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आपत्कालीन मदत कक्षाची स्थापना केली असून मदतीसाठी २४x७ हेल्पलाईनवर संपर्क साधा.
आपल्या मदतीसाठी कॉंग्रेस सदैव तत्पर! #निसर्ग #निसर्गचक्रीवादळ pic.twitter.com/I0k8M86nec
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 2, 2020
बीएमसी हेल्पलाईन क्रमांक
सर्व स्तरावर #CycloneNisarga ला सामोरे जाण्याची तयारी सुरू असताना नागरिकांना देखील त्यांच्या पातळीवर खबरदारी म्हणून काही पावले उचलण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत कृपया १९१६ डायल करून ४ दाबा.#Dial1916 #Press4 #BMCNisargaUpdate pic.twitter.com/BgSY4Z1Zgj
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 3, 2020
दरम्यान, मुंबईसह कोकण किनारपट्टीला आज निसर्ग चक्रीवादळाचा धोका आहे. काही तासांत हे वादळ धडकत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी वादळासाठी प्रशासन सज्ज असून जवळपास एनडीआरएफच्या 20 टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून किनारपट्टीवरील नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आले आहे.