नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पार्ट्यांचे आयोजन केले जात आहेत. तसेच पार्ट्यांमध्ये लपुनछपुन ड्रग्ज (Drugs) सर्रास वापरले जातात. अशीच एक टोळी मुंबईत काही दिवसांपासुन सक्रिय होती. पोलिसांनी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या 14 नायजेरियन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर ड्रग्जची तस्करी करुन कोट्यावधी रुपयांची रोकड मिळेल असे या नायजेरियन (Naigerian) तरुणांना वाटले होते.
नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पार्ट्यांचे दरवर्षी आयोजन केले जाते. त्यासाठी मुंबई पोलिसांकडून ही कडक सुरक्षायंत्रणेची व्यवस्था केली जाते. तर पार्ट्यासांठी वापरले जाणारे ड्रग्जी ऑनलाईन पद्धतीने विक्री केल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या नायजेरियन तरुणांना अटक केली आहे.
नायजेरिन तरुणांकडे ब्राऊन शुगर, कोकेन आणि एमडी असे अंमली पदार्थ मिळाले आहेत. तसेच 21 लाख रुपयांची रोकड, पिस्तुल आणि काडतुसेही नायजेरियन तरुणांकडून जप्त करण्यात आली आहेत.