Murder Case of Santosh Deshmukh | X @OmRajenimbalkr

बीड (Beed) च्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणी आता नवी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. नव्या एसआयटी मध्ये अनिल गुजर, विजयसिंह जोनवाल, महेश विघ्ने, आनंद शंकर शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज राजेंद्र वाघ, चंद्रकांत एस कलकुटे, बाळासाहेब देविदास आखाकोरे, संतोष भगवानराव गित्ते यांचा समावेश आहे. बसवराज तेली या एसआयटीच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

दरम्यान पूर्वीच्या एसआयटी वर देशमुख कुटुंबानेआक्षेप घेतला होता. देशमुख कुटुंबीयांसह अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतले होते. त्या एसआयटीमध्ये अनेक अधिकारी हे बीड मधील होते. सोबतच आरोप करण्यात आला होता की, यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी चांगले संबंधही होते. त्यामुळे एसआयटीमधील अधिकारी बदलण्यात यावे अशी मागणी सतत केली होती. ज्यानुसार आता सरकारने पुन्हा एकदा नव्या एसटीची बनवली आहे. (हेही वाचा; Santosh Deshmukh Murder Case: 'या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मी राजीनामा का द्यावा?'; Minister Dhananjay Munde यांचा सवाल).

काही दिवसांपूर्वी देशमुख कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आज सकाळी देखील संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. संतोष देशमुख यांच्या निधनाला महिना पूर्ण झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत आणि एसआयटी प्रमुखांना फोन करुन संतोष देशमुख यांच्या हत्या तपासात आरोपींना शासन कडक व्हावं आणि कोणालाही  दयामाया न दाखवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे आदेशही तपास यंत्रणांना दिले आहेत.