Sudhir Bhajipale with Rajesh Patil | X @Anjali Damania

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) राज्यात संतापाची लाट आहे. सीआयडीच्या तपासानुसार वाल्मिक कराड या हत्येमध्ये मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने नैतिकतेच्या कारणावरून मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अजूनही या प्रकरणात एक आरोपी फरार असताना आज धुळवडीच्या सेलिब्रेशन मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात निलंबित पोलिसांसोबत जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांचा रंग खेळत असल्याचा दावा करणारा फोटो अंजली दमानियांनी शेअर केला आहे. निलंबित पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि याच प्रकऱणात सक्तीच्या रजेवर असलेले पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन आज याच प्रकरणातील यांच्यासोबत धूळवड खेळताना फोटोमध्ये दिसत आहेत.

अंजली दमानिया यांनी हे फोटो सोशल मीडीयामध्ये शेअर करताना सुधीर भाजीपाले यांच्याकडून सुनावणी काढून घेऊन त्या ठिकाणी दुसरा न्यायाधीश देण्यात यावा अशी मागणी केली आहे. अंजलींच्या दाव्यानुसार, खंडणीचा कॉल हा राजेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला आणि प्रशांत महाजनने देखील अनेकदा आरोपींना मदत केली आहे. जर हे दोघे केजच्या न्यायाधीशांसोबत धुळवड साजरी करत असतील तर हे धक्कादायक असल्याची भावना अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिक मध्ये? गंगापूर रोड भागात पाहिल्याचा स्थानिकांचा दावा .

अंजली दमानिया यांची पोस्ट 

संतोष देशमुख यांची अत्यंत अमानुषपने हत्या करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे फोटोज, व्हिडिओज समोर आले आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येचे समोर आलेले कथित पुरावे मन विषण्ण करणारे आहेत.  राज्यभरातून या हत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मागणी जोर धरत आहे.